मी...
मी नावाच्या न संपणाऱ्या एका बोगद्यातून
मी जात राहतो अगदी शेवट पर्यंत
असं समजून की कदाचित या बोगद्याच्या त्या टोकाला
यातून सुटका असेल आणि हा प्रवास संपेल
बऱ्याच काळ जात राहतो आणि मग लक्षात येतं की
हा प्रवास तर न संपणारा आहे
मी आहे तोवर असाच चालू राहणारा आहे
आणि मी आहे म्हणून या प्रवासात मृत्यूही आहेच.
Comments
Post a Comment